माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर हे आपल्या स्पष्ट मतांसाठी नेहमी ओळखले जातात. अनेकदा स्पष्ट बोलणं मांजरेकरांना महागात पडत. सोशल मीडियावरही या स्वभावामुळे त्यांना अनेकदा टीका सहन करावी लागली आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या कामगिरीवर केलेल्या एका कमेंटमुळे मांजरेकर ट्रोल झाले होते. खुद्द रविंद्र जाडेजानेही त्यांना प्रत्युत्तर देत मी आतापर्यंत तुमच्यापेक्षा जास्त सामने खेळलो आहे असं म्हटलं होतं.

आयपीएलच्या तेराव्या हंगामात मांजरेकर यांना कॉमेंट्री पॅनलमध्ये जागा मिळालेली नसली तरीही सोशल मीडियावर ते आपली मतं मांडत असतात. काही दिवसांपूर्वी निवड समितीने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघनिवड केली. ट्विटरवर नितीश कुमार नामक युजरने टी-२० संघात रविंद्र जाडेजापेक्षा अक्षर पटेलची निवड अधिक योग्य ठरली असती. रविंद्र जाडेजा फिट नाहीये असं मत नोंदवलं. संजय मांजरेकरांनी या मताशी आपण सहमत असल्याचं म्हटलंय.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत असा असेल भारताचा टी-२० संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती

अवश्य पाहा – भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, टी-२० ते कसोटी संपूर्ण संघ एका क्लिकवर…