News Flash

पटेल सचिवपदी कायम; रवी सावंत यांच्याबाबत प्रश्नचिन्ह

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एन. श्रीनिवासन सज्ज झाले असून त्यांनी आपल्या संघामध्ये काही बदल करण्याचे सूतोवाच केले आहे.

| September 28, 2013 02:08 am

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एन. श्रीनिवासन सज्ज झाले असून त्यांनी आपल्या संघामध्ये काही बदल करण्याचे सूतोवाच केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय पटेल हे सचिवपदी कायम असून खजिनदारपदी असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रवी सावंत यांच्या पदाबाबत साशंकता आहे.
दक्षिण विभागातील एक सूचक आणि एक अनुमोदक मिळवून श्रीनिवासन अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले असले तरी अतिरिक्त तिसऱ्या वर्षांची धुरा सांभाळताना काही महत्त्वपूर्ण बदल ते करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘‘संजय पटेल यांच्यावर श्रीनिवासन यांचा पूर्णपणे विश्वास बसला आहे, कारण काही अडचणींच्या वेळी त्यांनी श्रीनिवासन यांना पाठिंबा दिला आहे. पण असे असले तरी रवी सावंत यांना खजिनदारपद पुन्हा देण्यात येईल असे वाटत नाही. सावंत यांच्या जागी दक्षिण विभागातील एक सदस्य खजिनदारपदावर येऊ शकतो,’’ असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 2:08 am

Web Title: sanjay patel may stay on as bcci secretary question mark over ravi savant
Next Stories
1 सावधान, माही वादळ घोंघावतंय!
2 इंडिया ‘ब्ल्यू’ संघाचा विजय
3 अर्जेटिनाच्या विश्वचषकाच्या आशा मेस्सीच्या तंदुरुस्तीवर -केम्प्स
Just Now!
X