17 January 2021

News Flash

एक नारी सब पर भारी! संजिता चानूच्या कामगिरीनंतर विरेंद्र सेहवाग खूश

स्नॅच प्रकारात संजिता चानूने ८४ किलो वजन उचलत नवीन विक्रमाची नोंद केली. यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात संजिता चानूने १०८ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर आपलं

दुसऱ्या दिवशी संजिता चानूची आश्वासक कामगिरी

गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टर्सनी भारताच्या झोळीत पदक टाकलं आहे. पहिल्या दिवशी मीराबाई चानू आणि गुरुराजा यांनी भारताला अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून दिलं. यानंतर दुसऱ्या दिवशी भारताच्यात संजिता चानूने ५३ किलो वजनी गटात भारताला आणखी एका सुवर्णपदकाची कमाई करुन दिली.

स्नॅच प्रकारात संजिता चानूने ८४ किलो वजन उचलत नवीन विक्रमाची नोंद केली. यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात संजिता चानूने १०८ किलो वजन उचलत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. संजिताच्या विजयानंतर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागसह सर्व स्तरातून तिच्या कामगिरीचं कौतुक करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2018 9:13 am

Web Title: sanjita chanus gold medal win at cwg 2018 receives praise from twitterati
Next Stories
1 २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील खेळाडू फिक्सिंगच्या जाळ्यात? राजस्थान पोलीसांकडून तपास सुरु
2 कुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू
3 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, ऑस्ट्रेलिया: दिपक लाथेरला कांस्यपदक, वेटलिफ्टर्सची धडाकेबाज कामगिरी सुरुच
Just Now!
X