05 March 2021

News Flash

महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्यपदक

जपानच्या अ‍ॅबे युकारीने २८ मिनिटे, ०६ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले.

महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रॉस कंट्री शर्यतीत भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारताच्या या उदयोन्मुख लांब पल्ल्याच्या धावपटूने ८ किमी शर्यतीत वैयक्तिक कांस्यपदक जिंकले. तसेच सांघिक गटातही भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. संजीवनीने २८ मिनिटे, १९ सेकंदांची वेळ नोंदवली. चीनच्या ली डॅनने २८ मिनिटे ०३ सेकंदासह सुवर्ण आणि जपानच्या अ‍ॅबे युकारीने २८ मिनिटे, ०६ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले.

सांघिक प्रकारात संजीवनीसह भारतीय गटात स्वाती गाढवे, झुमा खातून आणि ललिता बाबर यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीमुळे भारताने तिसरे स्थान पटकावले. वैयक्तिक गटात गाढवे (३०:१८ से.) आणि खातून (३२:१४ से.) यांनी अनुक्रमे ११ व १४ वे स्थान पटकावले. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत धडक मारून इतिहास घडवणाऱ्या बाबरला (३२:५३ से.) तळाच्या म्हणजेच १५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. लग्नानंतर बाबर प्रथमच स्पर्धेत सहभागी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:30 am

Web Title: sanjivani jadhav wins bronze in asian cross country championship
Next Stories
1 हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८ – भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा
2 दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी बीसीसीआय सकारात्मक – साबा करीम
3 इराणी करंडक २०१८ – वासिम जाफरची विक्रमी द्विशतकी खेळी, विदर्भाकडून धावांचा डोंगर
Just Now!
X