टी -२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १५ खेळाडूंच्या नावाची घोषणा जय शाह आणि चेतन शर्मा यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. जेव्हा टी -२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेक युवा खेळाडू हे संघाच्या बाहेर असल्याचे पाहायला मिळाले आहे. या यादीत केरळचा फलंदाज संजू सॅमसनचे नावही समाविष्ट आहे. भारतीय संघाच्या टी -२० संघात सतत आत आणि बाहेर असणाऱ्या सॅमसनला वर्ल्ड कप संघाच्या निवडीत दुर्लक्षीत करण्यात आले. विश्वचषक संघात निवड न झाल्यानंतर त्याच्यासाठी गोष्टी अधिक स्पष्ट झाल्या आहेत असे संजू सॅमसनने म्हटले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना केरळच्या संजू सॅमसने संघ निवडीबाबत भाष्य केलं आहे.”माझ्यासाठी आता गोष्टी स्पष्ट आहेत. तुम्ही स्पष्ट विचारांनी संघात जाणे महत्वाचे आहे. आयपीएल सुरू झाल्यावर निवडीबाबत माझ्या मनात शंका राहणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आयपीएलमध्ये खेळत आहात आणि भारतीय संघाच्या निवडीबद्दल विचार करत आहात, तर ही चुकीची मानसिकता आहे. लोक भारतीय संघात आपले स्थान पक्के करण्याबद्दल बरेच बोलतात. पण प्रत्यक्षात हे एक बाय प्रोडक्ट आहे. जर आपण चांगले काम केले तर आपल्याला संधी मिळतील, असे संजू सॅमसनने म्हटले आहे.

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी रद्द करण्यावर शार्दुल ठाकूरने सोडलं मौन

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामात संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये राजस्थानची कामगिरी विशेष नाही. संघाने सात पैकी फक्त तीन सामने जिंकले, तर चार सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

T20 World Cup: २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलप्रमाणे भारताला पुन्हा हरवणार; पाकिस्तानच्या हसन अलीचे वक्तव्य

संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाबाबतही भाष्य केलं आहे. ‘मला वाटते की आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेवर लक्ष ठेवलं जाते. लोक माझ्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतात आणि काही लोक माझ्याबद्दल वाईट देखील बोलतात. हे आता माझ्यासाठी सामान्य आहे. प्रत्येकावर अशा प्रकारचा दबाव असतो. संघाबाहेर जाण्यासाठी बरेच लोक बाहेर त्याची वाट पाहत आहेत हे माहिती असूनसुद्धा प्रत्येकजण या दबावातून जातो. भारतीय क्रिकेटच्या यशाचे हेच कारण आहे, असे संजू सॅमसनने म्हटले आहे.