ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला घरच्या मैदानावर मात दिल्यानंतर भारताची गाठ आता श्रीलंकेशी पडणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका येत्या १६ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. याआधी श्रीलंकेच्या संघाविरुद्ध बीसीसीआयने अध्यक्षीय संघाची घोषणा केली होती. या संघाचं नेतृत्व नमन ओझाकडे देण्यात आलं होतं. मात्र नमन ओझा दुखापतग्रस्त झाल्यामुळे संजू सॅमसनकडे या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

अवश्य वाचा – ज्या पदार्थांचं सेवन करत नाही, त्यांची जाहीरात करणार नाही – विराट कोहली

नमन ओझाच्या जागी पंजाबचा नवोदीत फलंदाज अनमोलप्रीत सिंह याला संघात जागा मिळाली आहे. ११-१२ नोव्हेंबर दरम्यान कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – काही लोकांना धोनीचं यश खुपतं आहे : रवी शास्त्री

असा असेल श्रीलंकेविरुद्ध भारताचा अध्यक्षीय संघ –

संजू सॅमसन (कर्णधार), अभिषेक गुप्ता, आकाश भंडारी, आवेश खान, जलल सक्सेना, जिवनज्योत सिंह, रवी किरण, रोहन प्रेम, बी. संदीप, तन्मय अग्रवाल, संदीप, अनमोलप्रीत सिंह

अवश्य वाचा – दिल्लीचे कब्रस्तानात रुपांतर होतंय – हरभजन सिंह