विश्वचषक स्पर्धा २०१९ मधील असमाधानकारक कामगिरीनंतरही पाकिस्तानचे नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि निवड समिती अध्यक्ष मिस्बाह-उल-हक यांनी श्रीलंका मालिकेसाठी सर्फराझ अहमद याची कर्णधार म्हणून फेरनिवड केली होती. पण त्यानंतर पाकिस्तानवर टी-२० मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की ओढवल्यामुळे अखेर सर्फराझची हकालपट्टी करण्यात आली. सर्फराझच्या जागी अझर अलीला कसोटी कर्णधारपद तर बाबर आझमला टी २० कर्णधारपद देण्यात आले आहे. JUST IN: Sarfaraz Ahmed has been removed as Pakistan's Test and T20I captain. Azhar Ali and Babar Azam will replace him. pic.twitter.com/3OhXWYbrCG — ICC (@ICC) October 18, 2019 विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संघाला सुमार कामगिरीचा फटका बसला. त्यामुळे साखळी फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर श्रीलंकेसोबत तब्बल १० वर्षांनी पाकिस्तानात खेळताना यजमानांनी २-० ने एकदिवसीय मालिका जिंकली, पण टी २० मालिकेत मात्र पाकिस्तानला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. कर्णधार आणि अनुभवी फलंदाज या नात्याने सर्फराझकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती. पण तो पूर्णपणे अयशस्वी ठरला. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने अखेर हा निर्णय घेतला.