भारताच्या सर्जूबाला देवी (४८ किलो) व सीमा पुनिया (८१ किलोवर) यांनी महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.

due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय

भारताच्या एम.सी.मेरी कोम (५१ किलो), एल.सरिता देवी (६० किलो) व पूजा राणी (७५ किलो) यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले होते. या पाश्र्वभूमीवर सर्जूबाला व सीमा यांचे यश उल्लेखनीय मानले जात आहे. सर्जूबालाने श्रीलंकेच्या एरांडी कालुनाथवर ३-० अशी मात केली. या लढतीत पहिल्या फेरीपासूनच सर्जूबालाने नियंत्रण राखले होते. २२ वर्षीय खेळाडू सर्जूबालाला पुढच्या फेरीत कझाकिस्तानच्या नझीम किझाबे हिच्याशी खेळावे लागणार आहे. किझाबेने स्वीडनच्या लिसी सँडबेजेरवर ३-० अशी मात केली.

सीमाने अझरबैजानच्या ऐनूर रिझायेवाला सहज हरविले. सुरुवातीपासूनच सीमाने केलेल्या आक्रमक चालींपुढे रिझायेवा हिचा बचाव निष्प्रभ ठरला. सीमाला चीनच्या शिजिन वाँगच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. शिजिनने उजबेकिस्तानच्या गुझाल इस्मातोवा हिचे आव्हान संपुष्टात आणले. भारताच्या पवित्राकुमारी (६४ किलो) हिला मात्र पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या स्केई निकोल्सन हिने तिला पराभूत केले.