06 March 2021

News Flash

सारलॉलक्स बॅडमिंटन स्पर्धा : जयराम विजयासह दुसऱ्या फेरीत

बेल्जियमच्या मॅक्सिम मॉरिल्सला २१-८, २१-८ असे अवघ्या १९ मिनिटांत पराभूत केले.

(संग्रहित छायाचित्र)

 

भारताच्या अजय जयरामने सारलॉलक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने बेल्जियमच्या मॅक्सिम मॉरिल्सला २१-८, २१-८ असे अवघ्या १९ मिनिटांत पराभूत केले.

जयरामची लढत दुसऱ्या फेरीत हॉलंडच्या तिसऱ्या मानांकित मार्क कॅलजॉशी होणार आहे. पहिल्याच गेममध्ये जयमराने ६-० अशा दणदणीत आघाडीने सुरुवात केली होती. ११-४ अशी आघाडी त्याने कायम ठेवली. तेथून पुढे पहिला गेम जिंकण्यास जयरामला अडचण आली नाही. दुसऱ्या गेममध्ये मॅक्सिमने खेळ उंचावल्याने जयरामकडे ६-४ अशी अवघी दोन गुणांचीच आघाडी होती. मात्र जयरामने तेथून सलग ११ गुण मिळवत १७-६ अशी दणदणीत आघाडी घेतली. जयरामला त्याबरोबरच विजयावर शिक्कामोर्तब करणे शक्य झाले.

भारताकडून गतविजेता लक्ष्य सेन, २०१८मधील या स्पर्धेतील विजेता शुभंकर डे आणि महिलांमध्ये मालविका बनसोड एकेरीत सहभागी होणार आहेत. लक्ष्य आणि शुभंकर या दोघांनाही पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 12:28 am

Web Title: sarlolax badminton tournament jayaram in the second round abn 97
Next Stories
1 सन-केन जोडीमुळे टॉटनहॅमचा बर्नलेवर विजय
2 नदाल गोल्फच्या मैदानावर
3 जोकोव्हिच आणि नदाल यांच्यात अग्रस्थानासाठी चुरस
Just Now!
X