राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारी उंच उडी प्रकारात महाराष्ट्राच्या सर्वेश कुशरेने सुवर्णपदक आणि १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत किरण सहदेवने कांस्यपदक मिळवले.

पुरुषांच्या उंच उडीमध्ये सर्वेशने २.२३ मीटर अंतर नोंदवले, केरळच्या जीओ जोसला रौप्य आणि कर्नाटकच्या बी. चेतनला कांस्यपदक मिळाले.

महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत किरण सहदेवने ३७:१०.५८ मिनिटे वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले. उत्तर प्रदेशच्या फूलन पालला सुवर्ण आणि कर्नाटकच्या कविता यादवला रौप्यपदक मिळाले. पुरुषांच्या १० हजार मीटर स्पर्धेत केरळच्या गोपी थोनाकालने सुवर्णपदक मिळवले, अर्जुन कुमार आणि विक्रम बंगरियाला कांस्यपदक मिळाले.

हरयाणाच्या अंजलीने दुखापतीतून सावरत महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवताना ५१.५३ सेकंद वेळ नोंदवली. सरिताबेन गायकवाड आणि जिस्ना मॅथ्यू यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळाले.