भारतीय वंशाचा खेळाडू सतनामसिंग भामराची एनबीए बास्केटबॉल लीगसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड झालेला भारतीय वंशाचा तो दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी सिम भुल्लरने या स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे.  सात फूट व एक इंच उंच असलेला सतनाम हा आयएमजी अकादमीत सराव करीत आहे.  महाविद्यालयीन व पदव्युत्तर पदवी शिक्षण गटात ४८ खेळाडू व आंतरराष्ट्रीय गटातील ४३ खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामध्ये सतनामचा समावेश आहे.सतनाम हा मूळचा पंजाबमधील बर्नाला येथील रहिवासी आहे. त्याने २०११मध्ये वुहान (चीन) येथे झालेल्या २६ व्या आशियाई बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.  तो गेली पाच वर्षे फ्लोरिडात आयएमजी रिलायन्स अकादमीत अन्य ३९ देशांच्या खेळाडूंबरोबर सराव करीत आहे.