ठाण्यातील एआरसी ऑफ नायर्स जलतरण तलावात सुरु असलेल्या ७६व्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी जलतरण स्पर्धेत सौरभ संगवेकरने पुरुषांच्या ४०० मी फ्रीस्टाइल प्रकारात ४:०६:०७ वेळेत शर्यत पूर्ण करत नवा विक्रम रचला. त्याने २०१० साली स्वत:च नोंदवलेला विक्रम मोडीत काढला. विराज ढोकळेने दुसरे तर आर्यन माखिजाने तिसरे स्थान पटकावले. १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात रोहित हवालदारने १:००:४९ वेळेसह नवा विक्रम केला. नील गुंडेने द्वितीय तर अजेय मोघेने तृतीय स्थान मिळवले. महिलांमध्ये ठाण्याच्या ज्योत्स्ना पानसरेने १:०८:४६ या वेळेसह नवा विक्रम नावावर केला. तिने काव्या भांडारकरचा विक्रम मोडीत काढला. आरती घोरपडेने दुसरे तर युगा बिरनेलेने तिसरे स्थान प्राप्त केले.
४०० मीटर फ्री स्टाइल महिलांमध्ये मोनिक गांधीने ४:४०:०६ वेळेसह अव्वल स्थान कमावले. आरती घोरपडेने द्वितीय तर सिद्धी कोतवालने तृतीय स्थान पटकावले.