News Flash

खेळाडूला करोनाची लागण, ENG vs SA एकदिवसीय मालिका पुढे ढकलली

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला करोनाची लागण

द. आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार खबरदारीचा उपाय म्हणून सामना पुढे ढकलला आहे.  इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान आजपासून तीन सामन्याची एकदिवसीय मालिका होणार होती. मात्र आज, होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वीच एका खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पहिला सामना रविवारी, ६ डिसेंबर रोजी होणार आहे. आयसीसीनं याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे.

दरम्यान नुकत्याच झालेल्या तीन सामन्याच्या टी-२० मालिकेत इंग्लंडनं आफ्रिकेचा ३-० नं पराभव केला आहे. टी-२० मालिकेनंतर आता दोन्ही संघात एकदिवसीय मालिका होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या खेळाडूला करोनाची लागण झाली याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूची काळजी घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झालं आहे. गेन्यूझीलंडमध्ये असलेले पाकिस्तानच्या १० खेळाडूंनाही ल्या आठवड्यात करोनाची लगाण झाल्याचं समोर आलं होतं. जवळपास सात ते आठ महिने करोनामुळे क्रिकेटला ब्रेक लागला होता. मात्र, आता पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरु झालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 4:06 pm

Web Title: saveng odi has been postponed after a south africa player tested positive for covid 19 nck 90
Next Stories
1 टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, दुखापतग्रस्त जाडेजा मैदानाबाहेर
2 झुंजार! दुखापतीनंतरही जाडेजानं कांगांरुंची केली धुलाई
3 ‘सर जाडेजां’च्या फटकेबाजीने बदललं सामन्याचं चित्र, धोनीचा विक्रम मोडला
Just Now!
X