26 February 2021

News Flash

ऋषभ पंतची आक्रमक शतकी खेळी, भारताकडून टी-२० सामन्यात सर्वात जलद शतकाचा विक्रम पंतच्या नावावर

हिमाचल विरुद्ध सामन्यात ठोकलं शतक

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात पंतची वादळी खेळी

सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिल्लीच्या ऋषभ पंतने सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रविवारी नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या सामन्यात पंतने वादळी खेळी केली. ऋषभने ३२ चेंडुंमध्ये शतक झळकावत भारताच्या रोहित शर्माचा विक्रम मागे टाकला. रोहितने २०१७ साली इंदूर येथे झालेल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडुंमध्ये शतक झळकावलं होतं.

विजयासाठी आवश्यक असलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने डावाची आक्रमक सुरुवात केली. यात ऋषभ पंतच्या शतकाने दिल्लीचा विजय अधिक सोपा करुन दिला. पंतने ३८ चेंडुंमध्ये ११६ धावा काढल्या. या शतकी खेळीमध्ये ८ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता. ऋषभच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने हिमाचल प्रदेशवर १० गडी राखून मात केली.

टी-२० सामन्यात भारताकडून सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज –

१) ऋषभ पंत – ३२ चेंडूत शतक – दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश

२) रोहित शर्मा – ३५ चेंडूत शतक – भारत विरुद्ध श्रीलंका

३) युसूफ पठाण – ३७ चेंडूत शतक – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2018 4:14 pm

Web Title: sayeed mushtak ali t 20 tournament rishabh pant registers fastest t20 century by indian batsman
टॅग : Rishabh Pant
Next Stories
1 विराट कोहलीच्या खेळीमुळे भारताचं आव्हान कायम, भारताचा निम्मा संघ माघारी
2 U-19 World Cup 2018 – सलामीच्या सामन्यात भारताची ऑस्ट्रेलियावर मात, पृथ्वी शॉची कर्णधाराला साजेशी खेळी
3 सेंच्युरिअनमध्ये अपयशी ठरलास तर स्वतः संघाच्या बाहेर पड, विरेंद्र सेहवागचा विराट कोहलीला सल्ला
Just Now!
X