News Flash

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा – सुपर लिग सामन्यांसाठी मुंबईच्या संघाची घोषणा, आदित्य तरेकडे संघाचं नेतृत्व

२१ जानेवारीपासून सामन्यांना सुरुवात

कर्णधार आदित्य तरेला या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करता आलेली नाही

सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी सुपर लिग सामन्यांकरता मुंबईच्या संघाची घोषणा आज करण्यात आलेली आहे. २१ जानेवारीपासुन कोलकाता शहरात सुपर लिग प्रकाराचे सामने खेळवण्यात येणार आहेत. पश्चिम विभागातून बडोदा आणि मुंबईचे संघ सुपर लिग प्रकारासाठी पात्र ठरले आहेत. साखळी फेरीत मुंबईने ४ पैकी २ तर बडोद्याने ४ पैकी ४ सामने जिंकले आहेत.

अपेक्षेप्रमाणे यष्टीरक्षक आदित्य तरेकडे मुंबईच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. याव्यतिरीक्त धवल कुलकर्णी, जय बिस्ता, अखिल हेरवाडकर, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड यांनाही संघात जागा मिळाली आहे. याचसोबत मांडीच्या दुखापतीतून सावरलेल्या श्रेयस अय्यरलाही संघात जागा मिळाल्याने मुंबईच्या संघासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे.

सुपर लिग सामन्यांसाठी असा असेल मुंबईचा संघ –

आदित्य तरे (कर्णधार), धवल कुलकर्णी (उप-कर्णधार), अखिल हेरवाडकर, जय बिस्ता, सुर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शशांक सिंह, श्रेयस अय्यर, आकाश पारकर, ध्रुमील मातकर, शार्दुल ठाकूर, एकनाथ केरकर, परिक्षीत वाळसंगकर, शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 6:18 pm

Web Title: sayeed mushtaq ali t 20 trophy aaditya tare to lead mumbai team in super league stage
टॅग : Mca
Next Stories
1 U-19 World Cup 2018 – आदित्य ठाकरेचा भारतीय संघात समावेश
2 दुखापतग्रस्त वृद्धीमान साहा संघाबाहेर, तिसऱ्या कसोटीसाठी दिनेश कार्तिकचा संघात समावेश
3 आयसीसी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहलीला शिक्षा
Just Now!
X