News Flash

प्रत्येक खेळात घोटाळे होतात- विजय मल्ल्या

स्पॉट फिक्सिंगग्रस्त मागील आयपीएल मोसमाचा यावेळीच्या आयपीएलच्या प्रसिद्धीवर परिणाम होणार नाही. उलट प्रत्येक खेळात घोटाळे होतच असतात असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक विजय मल्ल्या

| February 12, 2014 04:16 am

स्पॉट फिक्सिंगग्रस्त मागील आयपीएल मोसमाचा यावेळीच्या आयपीएलच्या प्रसिद्धीवर परिणाम होणार नाही. उलट प्रत्येक खेळात घोटाळे होतच असतात असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक विजय मल्ल्या यांचे म्हणणे आहे.
विजय मल्ल्या म्हणतात, प्रत्येक खेळात घोटाळे होतच असतात. त्यामुळे त्या स्पर्धेच्या प्रसिद्धी आणि प्रतिष्ठेवर कोणताही परिणाम होत नाही. जर आम्हाला आयपीएल बद्दल काही वाटत नसते तर, आज आम्ही येथे आलोच नसतो असेही मल्ल्या आज आयपीएल लिलावा दरम्यान म्हणाले. आयपीएलची प्रतिष्ठा आहे तशीच कायम आहे आणि राहील असेही मल्ल्या म्हणाले. तसेच घडलेले फिक्सिंग प्रकरण दुर्दैवी ठरले हे खरे आहे. पण, आयपीएलची प्रतिष्ठा अबाधित राहील असा विश्वासही मल्ल्या यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2014 4:16 am

Web Title: scams happen in every sport mallya
टॅग : Ipl
Next Stories
1 विराट कोहली ट्वेन्टी-२० क्रमवारीत चौथ्या स्थानावर कायम
2 क्रिकेटचे तिन्ही स्वरूप जपण्याचे माझे प्रयत्न- एन.श्रीनिवासन
3 श्रीनिवासन यांचा पाय खोलात
Just Now!
X