21 January 2019

News Flash

बॉलीवूड सादरीकरणासह आयपीएलच्या नवव्या हंगामाचे उद्घाटन

बॉलीवूडमधील पाश्र्वगायक अंकित तिवारीसह ड्वेन ब्राव्होने चॅम्पियन गाण्यावर उपस्थितांना ठेका धरायला लावला.

महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, डेव्हिड मिलर, गौतम गंभीर, सुरेश रैना, रोहित शर्मा, झहीर खान या स्पर्धेतील आठ संघांच्या कर्णधारांनी यावेळी ‘सेल्फी’ काढला.

बॉलीवूड तारेतारकांच्या दिमाखदार नृत्य सादरीकरण, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा चॅम्पियन डान्स अशा नयनरम्य सोहळ्याद्वारे इंडियन प्रीमिअर लीगच्या नवव्या हंगामाचे उद्घाटन झाले. या सोहळ्यात रणवीर सिंग, कतरिना कैफ, यो यो हनी सिंग, जॅकलीन फर्नाडिझ यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. बॉलीवूडमधील पाश्र्वगायक अंकित तिवारीसह ड्वेन ब्राव्होने चॅम्पियन गाण्यावर उपस्थितांना ठेका धरायला लावला.

First Published on April 9, 2016 4:05 am

Web Title: season 9 ipl team captains pose for selfie