26 February 2021

News Flash

सचिनच्या निवृत्तीमुळे निवड समितीला दिलासा -प्रसन्ना

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा सचिन तेंडुलकरचा निर्णय व्यावहारिक असून त्यामुळे राष्ट्रीय निवड समिती सदस्यांना दिलासाच मिळाला आहे, असे मत भारताचे माजी फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी

| December 25, 2012 03:48 am

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा सचिन तेंडुलकरचा निर्णय व्यावहारिक असून त्यामुळे राष्ट्रीय निवड समिती सदस्यांना दिलासाच मिळाला आहे, असे मत भारताचे माजी फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ‘‘सचिनला एकदिवसीय संघात स्थान द्यावे की वगळावे, हा प्रश्न आता सचिनच्या निवृत्तीनंतर निवड समितीला पडणार नाही. सचिनला संघातून वगळले असते तर निवड समिती सदस्यांवर प्रश्नांची सरबत्ती झाली असती. त्याचबरोबर सचिनच्या क्षमतेविषयीही अनेक प्रश्न उपस्थित झाले असते. सचिन हा महान क्रिकेटपटू आहे, यात शंकाच नाही. यशाने तो हुरळून गेला नाही आणि अपयशाने तो खचून गेला नाही. गेल्या काही महिन्यांत सचिनची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चांगली होत नव्हती. म्हणूनच कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठीच त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असावी. कसोटीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच लोक ओळखतात, हे सचिनला माहीत आहे.’’     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 3:48 am

Web Title: selecting committee get relif because of sachin makes his retirment prasanna
टॅग : Sachin Tendulkar,Sports
Next Stories
1 सचिनकडून भरपूर शिकलो -धोनी
2 सचिन हाच खरा अद्वितीय क्रिकेटपटू – जयसूर्या
3 क्रिकेटच्या अतिरेकामुळेच भारताची खराब कामगिरी -श्रीनाथ
Just Now!
X