वेस्ट इंडिजच्या आगामी भारत दौऱ्यासाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीने कर्णधारपदी पुनरागमन केलेलं आहे. ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहेत.

आगामी वर्षांत भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा लक्षात घेता निवड समिती रोहित शर्माला विंडीज दौऱ्यात विश्रांती देणार अशी चर्चा होती. याचसोबत गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजीतला फॉर्म गमावलेल्या शिखर धवनलाही डच्चू मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र निवड समितीने शिखर धवनला आणखी एक संधी देण्याचं ठरवलं आहे. याचसोबत रोहित शर्मालाही संघात जागा मिळाली आहे. याचसोबत गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारलाही संघात जागा मिळाली आहे. याचसोबत कृणाल पांड्यालाही या संघात स्थान मिळालेलं नाहीये.

टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार</p>

वन-डे मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, केदार जाधव, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, दिपक चहर, भुवनेश्वर कुमार

अवश्य वाचा – वानखेडे मैदानावर पहिला टी-२० सामना अडचणीत, सुरक्षा पुरवण्यास मुंबई पोलिसांची असमर्थता