भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड २४ जून रोजी धरमशाला येथे होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीच्या बैठकीत होणार आहे.

बीसीसीआयची बैठक नियमित स्वरूपाची असली, तरी त्यामध्ये मुख्य प्रशिक्षकाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे एक वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत सांगितले.

भारताच्या प्रशिक्षकपदासाठी रीतसर अर्ज मागवले होते. माजी कर्णधार अनिल कुंबळे, संघाचे माजी संचालक रवी शाया बैठकीत विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.स्त्री, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह ५७ जणांचे अर्ज आले आहेत. गतवर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्याबरोबर केलेला करार संपल्यानंतर अद्याप एकही मुख्य प्रशिक्षक नियुक्त करण्यात आलेला नाही.

या बैठकीत विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. रणजी सामने त्रयस्थ ठिकाणी घेण्याच्या शिफारशींवर या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या शिफारशींना काही खेळाडू व प्रशिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. या बैठकीपूर्वी एक दिवस अगोदर रणजी संघांचे कर्णधार व प्रशिक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या चर्चेच्या आधारेच रणजी सामन्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. कार्यकारिणीची ही शेवटची सभा असल्यामुळे विविध महत्त्वांच्या विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.