News Flash

वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा :  महाराष्ट्राची विजयी सलामी

महाराष्ट्राने सुरुवात जोरदार करीत पहिल्या सत्रात दोन लोण देत ३१-१६ अशी आघाडी घेतली.

मुंबई:अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू झालेल्या असलेल्या पुरुषांच्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ह-गटात महाराष्ट्राने मणिपूरला ४९-३० असे नमवून विजयी सलामी नोंदवली.

महाराष्ट्राने सुरुवात जोरदार करीत पहिल्या सत्रात दोन लोण देत ३१-१६ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मणिपूरने जोरदार प्रतिकार करीत महाराष्ट्रावर लोण चढवण्याचा प्रयत्न केला. शिलकी दोन खेळाडूत पकड केल्यावर मग आणखी दोन गुण घेत महाराष्ट्रान होणारा लोण मणिपूरवर परतवला. अजिंक्य पवार, पंकज मोहिते यांच्या चढायांना शुभम शिंदे, गिरीश इरनाक यांच्या पकडींची साथ यामुळे हे शक्य झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:02 am

Web Title: senior national kabaddi championship maharashtra win opening match zws 70
Next Stories
1 भारताचे माजी हॉकीपटू बलबीर सिंग (धाकटे) यांचे निधन
2 MI vs KKR : मुंबई इंडियन्सने चेन्नईत उभारली विजयाची गुढी
3 IPL 2021 : आंद्रे रसेलच्या भन्नाट स्पेलमुळे मुंबई गारद
Just Now!
X