बेंगळूरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) केंद्रात गेल्या तीन महिन्यांपासून वास्तव्यास असलेल्या भारताच्या हॉकी खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र घरी जाऊन पुन्हा ‘साइ’च्या केंद्रात परतल्यावर त्यांना १४ दिवसांचे विलगीकरण अनिवार्य आहे, असे हॉकी इंडियाने शनिवारी स्पष्ट केले.

करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हॉकी इंडियाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. हे नियम वरिष्ठ हॉकीपटूंप्रमाणे कनिष्ठ खेळाडूंसाठीही लागू आहेत. ‘‘साइचे केंद्र करोनापासून मुक्त ठेवायचे आहे. खेळाडू केंद्रात परतल्यावर त्यांना १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल,’’ अशा सूचना हॉकी इंडियाने दिल्या आहेत.