फुटबॉल नियंत्रित करणाऱ्या फिफा संघटनेतील महाघोटाळ्यातील आरोपी माजी अध्यक्ष सेप ब्लाटर आणि युएफाचे अध्यक्ष मिचेल प्लॅटिनी यांच्या शिक्षेत घट झाली आहे. मात्र ते दोघेही आचारसंहिता भंगप्रकरणी दोषी आहेत असे फिफाच्या अपील समितीने सांगितले. या दोघांवर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. परस्परविरोधी हितसंबंधाच्या प्रकरणी हे दोघे दोषी आढळले होते. ब्लाटर अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर प्लॅटिनी यांचे नाव चर्चेत होते. मात्र बंदीच्या शिक्षेमुळे प्लॅटिनी यांचा मार्ग बंद झाला. बंदीची शिक्षा कमी होण्यासाठी ब्लाटर आणि प्लॅटिनी आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दोघावर पुढील सहा वर्ष बंदी असल्याने अध्यक्षपदासाठी युएफाचे सरचिटणीस जिआनी इन्फॅटिनो आणि आशिया फुटबॉलचे प्रमुख नेते शेख सलमान बिन इब्राहिम शर्यतीत आहेत.