News Flash

विजेतेपदासाठी सेरेनाचे पारडे जड

जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स हिचे चार्ल्सटन फॅमिली सर्कल चषक टेनिस स्पर्धेतील विजेतेपदासाठी पारडे जड मानले जात आहे. मियामी स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळविणाऱ्या सेरेनाला येथे

| April 3, 2013 03:09 am

जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स हिचे चार्ल्सटन फॅमिली सर्कल चषक टेनिस स्पर्धेतील विजेतेपदासाठी पारडे जड मानले जात आहे.
मियामी स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळविणाऱ्या सेरेनाला येथे पहिल्या फेरीत पुढे चाल देण्यात आली असून दुसऱ्या फेरीत तिच्यापुढे इटलीची कॅमिला गिओर्गी हिचे आव्हान असेल. कॅमिला हिने पहिल्या फेरीत मँडी मिनेल्ला हिचा ६-४, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. कारकिर्दीत १५ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेना हिने येथे गतवर्षी विजेतेपद मिळविले होते.
डॅनिश खेळाडू कॅरोलीन वोझ्नियाकी हिला दुसऱ्या फेरीत स्पेनच्या सिल्व्हिया सोलेर एस्पिनोसा हिच्याशी खेळावे लागणार आहे. सोलेर हिने इटलीच्या फ्रान्सिस्का शियाव्हेना हिच्यावर ३-६, ६-४, ७-६ (८-६) असा विजय नोंदविला. पोर्ट रिको संघाच्या मोनिका पुईग हिने चेक प्रजासत्ताकच्या आंद्रिया हॅव्हालकोवा हिचा ६-४, ६-० असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 3:09 am

Web Title: serena will win the charleston tennis competition
टॅग : Serena Williams,Sports
Next Stories
1 संदीप पाटील यांचा मुंबईच्या निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा
2 ब्राझीलच्या लष्करशाही सत्ताधिकाऱ्यांकडून पेले यांची चौकशी झाली होती
3 चर्चिल ब्रदर्सचा सफाईदार विजय
Just Now!
X