News Flash

सेरी-ए फुटबॉल स्पर्धा : युव्हेंट्सच्या विजयात रोनाल्डोची चमक

रोनाल्डोचा या स्पर्धेच्या हंगामातील २५वा गोल ठरला.

संग्रहित छायाचित्र

अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने केलेल्या गोलमुळे युव्हेंट्सने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत टोरिनोला ४-१ फरकाने नमवले. याबरोबरच विक्रमी सलग १०व्या सेरी-ए विजेतेपदाच्या दिशेने युव्हेंटसची प्रभावी कामगिरी सुरू राहिली.

रोनाल्डोचा या स्पर्धेच्या हंगामातील २५वा गोल ठरला. युव्हेंट्सकडूनचा त्याचा हा ४६ वा गोल आहे. युव्हेंट्सकडून फ्री-कीकवर प्रथमच गोल करण्यात रोनाल्डोला यश आले. युव्हेंट्सचे ३० सामन्यांतून ७५ गुण झाले आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या लॅझियोला मिलानकडून ०-३ पराभव पत्करावा लागल्याने युव्हेंट्सला सात गुणांची आघाडी मिळवता आली. युव्हेंटसचा गोलरक्षक गियानलुगी बफॉनचा हा सेरी-ए फुटबॉल स्पर्धेतील विक्रमी ६४८वा सामना होता. ४२ वर्षीय बफॉनने एसी मिलानचा महान माजी खेळाडू पावलो माल्डिनीचा सेरी-एमधील सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम मोडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:02 am

Web Title: serie a football tournament ronaldos brilliance in juventus victory abn 97
Next Stories
1 आव्हानात्मक पुनरागमनानंतर ऑलिम्पिक पात्रतेचे ध्येय!
2 आकाश भारताचा ६६वा ग्रँडमास्टर
3 Video : क्रिकेटचं पुनश्च हरिओम
Just Now!
X