23 September 2020

News Flash

ICC चा पाकिस्तानला दणका; BCCI विरुद्धची याचिका फेटाळली

BCCI विरोधात PCBने याचिका दाखल केली होती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरु असलेल्या वादावर आज अखेर पडदा पडला. ICC ने PCB ला चांगलाच दणका दिला आहे. BCCI विरोधात ICC च्या dispute पॅनल कडे धाव घेतलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाची याचिका आज या पॅनेलने फेटाळून लावली आहे. भारतीय संघ पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळण्यास तयार नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे BCCI विरोधात PCBने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ICC च्या विशेष समितीने तीन दिवसाची सुनावणी घेत BCCI ला दिलासा दिला आहे. तर ही याचिका फेटाळण्यात आल्याने PCBला चांगलाच दणका मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 3:15 pm

Web Title: setback for pcb from icc dispute panel as it has dismissed pcbs claim against bcci
टॅग Bcci,Icc,Pcb
Next Stories
1 World Boxing Championship : मेरी कोमचे पदक निश्चित; उपांत्य फेरीत धडक
2 IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा कर्णधारच म्हणतो विराट जगातील सर्वोत्तम खेळाडू
3 IND vs AUS : पहिल्या टी२०साठी भारतीय संघ जाहीर, मनीष पांडे बाहेर
Just Now!
X