ग्रँडमास्टर एस.पी. सेतुरामनने आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत विदित गुजरातीवर मात करत जेतेपदावरची दावेदारी सिद्ध केली. नवव्या फेरीत, काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना सिसिलियन बचाव पद्धतीद्वारे खेळताना विदितने डावाच्या मध्यात आघाडी मिळवली होती मात्र सेतुरामने आखलेल्या व्यूहरचनेत विदित अडकला आणि ३२व्या चालीनंतर सेतुरामनने विदितला मागे टाकत आगेकूच केली. या महत्त्वपूर्ण विजयामुळे सेतुरामनने अव्वल मानांकित इव्हान पोपोव्ह तसेच द्वितीय मानांकित लेव्हान पॅन्ट्सुलिया यांना मागे टाकत अध्र्या गुणाची आघाडी घेतली आहे. दरम्यान भारताच्या तीन बुद्धिबळपटूंनी इंटरनॅशनल मास्टर्स नॉर्म मिळवला. महाराष्ट्राच्या अनिरुद्ध देशपांडे आणि तामिळनाडूच्या कुणाल एम आणि आकाश पीसी अय्यर यांनी हे यश मिळवले.
रशियन ग्रँडमास्टर पोपोव्ह आणि अर्मेनियाचा ग्रँडमास्टर सॅमव्हेल तेर साहाख्यान यांच्यातील लढत बरोबरीत संपली तर दुसऱ्या लढतीत जॉर्जिआच्या पॅन्ट्सुलियाने युवा भारतीय इंटरनॅशनल मास्टर कार्तिकेयन मुरलीवर मात करत आगेकूच केली.