News Flash

Australian Open 2020 : सेरेना विल्यम्सचं आव्हान संपुष्टात

तिसऱ्या फेरीत चीनच्या क्विंग वँगने केली मात

सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचं ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. तिसऱ्या फेरीत चीनच्या क्विंग वँगने सेरेनावर ४-६, ७-६ (७-२), ५-७ अशी मात केली. तब्बल दोन तास ४० मिनीट चाललेल्या या सामन्यात चीनच्या क्विंग वँगने सेरेनाची झुंज मोडून काढत सनसनाटी विजय नोंदवला.

पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत दमदार पुनरागमन केलं. अखेरच्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी झुंज दिली, मोक्याच्या क्षणी सेरेनाचं स्वतःवर नियंत्रण सुटल्याने क्विंगने फायदा घेत आघाडी करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवामुळे आपलं २४ वं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं सेरेनाचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान, चौथ्या फेरीत वँगसमोर ट्युनिशीआच्या ओन्स जाबेउरचं आव्हान असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 5:49 pm

Web Title: seven time champion serena williams knocked out of australian grand slam psd 91
Next Stories
1 Ind vs NZ : चर्चा तर होणारच ना ! टीम इंडियाची टी-२० क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी
2 Ind vs NZ : पहिल्या टी-२० सामन्यात घडला अनोखा विक्रम, जाणून घ्या…
3 Ind vs NZ : राहुल, नाम तो सुना ही होगा ! संघाच्या विजयात बजावली मोलाची भूमिका
Just Now!
X