News Flash

IPL : चेन्नई सुपरकिंग्जच्या फिरकीपटूचा आयपीएलला रामराम

ट्विटरवरुन जाहीर केली निवृत्ती

स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळणारा आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं प्रतिनिधीत्व केलेल्या, फिरकीपटू शादाब जकाटीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शादाबने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे.

शादाबच्या कारकिर्दीवर एक नजर –

स्थानिक क्रिकेटमध्ये शादाब जकाटीने आतापर्यंत ९२ सामने खेळले असून त्याच्या नावावर २७५ बळी जमा आहेत. आयपीएलमध्ये शादाबने चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात लायन्स या ३ संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. मात्र धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये त्याची कामगिरी अधिक चांगली झाली आहे. भारतीय संघात खेळण्याची संधी शादाबला मिळाली नाही.

आयपीएलमध्ये शादाबने ५९ सामन्यांमध्ये ४७ बळी घेतले आहेत. २०१० साली सचिन तेंडुलकर आणि २०११ साली एबी डिव्हीलियर्सला बाद केल्यानंतर शादाब चर्चेत आला होता. सलग २ सामन्यांमध्ये ४ बळी घेणारा शादाब आयपीएलमधला पहिला गोलंदाज ठरला होता.

शादाब जकाटी

 

संघ आणि सहकाऱ्यांनीही केलं कौतुक –

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नसली तरीही मार्च महिन्याच्या अखेरीस आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2019 8:57 am

Web Title: shadab jakati former goa ipl cricketer announces retirement psd 91
टॅग : Csk,IPL 2020
Next Stories
1 बहुचर्चित मेरी कोम विरुद्ध निखत झरीन सामना आज
2 अ.भा.मानांकन टेनिस स्पर्धा : महाराष्ट्राच्या सालसा आहेरला दुहेरी मुकुट
3 मिलर मुंबई मॅरेथॉनची सदिच्छादूत
Just Now!
X