News Flash

मतदान कार्ड बनण्याच्या आधीच शफाली वर्माचा इंग्लंडमध्ये भीमपराक्रम!

शफालीने आज आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत मोठा विक्रम रचला आहे.

शफाली वर्मा

क्रिकेटच्या मैदानावर धमाकेदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या ‘लेडी सेहवाग’ने म्हणजेच शफाली वर्माने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. मतदान कार्ड बनण्याच्या आधी भारताच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये पदार्पण करणारी ती पहिली क्रिकेटपटू बनली आहे. आज शफालीने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले. तिचे वय १७ वर्षे आणि १५० दिवस असे आहे. भारतीय महिला आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील हा सामना ब्रिस्टॉलमध्ये खेळला जात आहे.

शफाली वर्माने १५ वर्षांची असताना २०१९मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. तिने २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिनने १६ वर्षे वय असताना क्रिकेटविश्वाच धमाल उडवून दिली होती. १८ वर्षांचा होईपर्यंत त्याने आपले नाव जगभर पोहोचवले होते.

 

 

पहिल्या वनडेत शफाली अपयशी

शफाली वर्माने ११ दिवसांपूर्वी तिच्या कारकिर्दीची पहिली कसोटी खेळली. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये तिने अर्धशतके झळकावली होती आणि ती भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी ती खेळाडू ठरली. वनडे कारकिर्दीत तिला दमदार सुरुवात करता आली नाही. ब्रिस्टॉलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ती १५ धावा करून ती बाद झाली.

हेही वाचा – रोहितऐवजी मयंक आणि शुबमनला ओपनिंग पाठवले गेले पाहिजे, गावसकरांनी दिला सल्ला

भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा विक्रम रजनी वेणुगोपालच्या नावावर आहे. वयाच्या १५व्या वर्षी ती भारतासाठी प्रथमच मैदानावर उतरली. या यादील शफाली वर्मा दहाव्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 5:09 pm

Web Title: shafali verma became youngest indian cricketer to make debut across formats adn 96
Next Stories
1 रोहितऐवजी मयंक आणि शुबमनला ओपनिंग पाठवले गेले पाहिजे, गावसकरांनी दिला सल्ला
2 भारतीय महिला संघाची विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
3 भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राची फिनलंडमध्ये चमकदार कामगिरी