27 September 2020

News Flash

IPL 2020 : चाहत्याने KKR बद्दल विचारला प्रश्न; शाहरूखने दिलं मजेदार उत्तर

शाहरूखच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मनं

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये आहे. २४ जानेवारी ते ४ मार्च असा भारताचा मोठा दौरा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी २०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. तर त्यानंतर मार्च अखेरीस IPL 2020 सुरू होणार आहे. यंदाचे IPL हे भारतीय संघातील खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण भारतासाठी ही स्पर्धा म्हणजे T20 World Cup 2020 ची रंगीत तालीम असणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू, संघमालक आणि चाहते यंदाच्या IPL कडे डोळे लावून बसले आहेत. त्यातील एका चाहत्याने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा मालक शाहरूख खान याला एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे शाहरूखने मजेशीर उत्तर दिले.

पुरूषांच्या क्रिकेट सामन्यांतून नफा, मग… – स्मृती मंधाना

बॉलीवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान आपल्या हजरजबाबी विधानांसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुन्हा एकदा दिसून आले. शाहरूख खानने सोशल मीडियावर ‘आस्क एसआरके’ (#AskSRK) असा हॅशटॅग वापरला. त्यामुळे चाहत्यांनी त्याला खूप सारे प्रश्न विचारले. त्यात शाहरूखला IPL मधील KKR बाबतही प्रश्न विचारण्यात आला. युवा खेळाडू शुभमन गिल याला KKR संघाचा कर्णधार कधी बनवणार असा प्रश्न विवेक सुब्रमण्यम नावाच्या एका ट्विटर यूजरने शाहरुखला विचारला.

राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी का?; रवी शास्त्रींनी दिलं भन्नाट उत्तर

त्याच्या या प्रश्नावर शाहरूख काय उत्तर देणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. शाहरुखने देखील झकास असा रिप्लाय दिला. “तुम्हाला KKR संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवलं की लगेच शुभमन गिलला कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपदी देण्यात येईल”, असे शाहरूखने सांगितले.

खिलाडूवृत्ती! U-19 टीम इंडियाने पराभूत संघासोबत काढला फोटो

शाहरुखच्या या मजेशीर उत्तराचे साऱ्यांनीच कौतुक केले. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर KKR ने देखील शाहरुखला #savagereply असे असे म्हणत शाहरुखचे आभार मानले आणि ब्रँडन मॅक्युलमचा एक बोलका फोटोही वापरला. मॅक्युलमची यंदाच्या हंगामासाठी KKR च्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 11:53 am

Web Title: shah rukh khan gives an epic reply to a fan asking when will shubman gill captain kkr humourous vjb 91
Next Stories
1 पुरूषांच्या क्रिकेट सामन्यांतून नफा, मग… – स्मृती मंधाना
2 रात्री तापाने फणफणत होता, दुसऱ्या दिवशी ठोकलं त्रिशतक
3 तिरंगी स्पर्धा विश्वचषकाच्या संघबांधणीसाठी उपयुक्त!
Just Now!
X