07 June 2020

News Flash

करोनाशी लढा : शाहबाज नदीमने स्वीकारली ३५० कुटुंबांची जबाबदारी, स्वतः करतोय अन्नदान

माणसाचा जीव महत्वाचा, आयपीएल पुढच्या वर्षीही होऊ शकतं !

देशभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये झारखंडचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या शाहबाज नदीमने या काळात परिस्थितीचं गांभीर्य ओळखत स्थानिक गरजू लोकांच्या अन्नधान्याची जबाबदारी स्विकारली आहे. नदीम सध्या धनबाद जिल्ह्यातील आपल्या झारिया या गावात राहतो आहे. सध्याच्या खडतर काळात आपल्या परिसरातील ३५० कुटुंबाना अन्नदान करण्याचा निर्णय नदीमने घेतला आहे. नदीम या कुटुंबांसाठी तांदुळ, इतर गरजेचं धान्य, भाजीपाला आणि साखर अशा वस्तु पुरवत आहे.

“आतापर्यंत मी १५० कुटुंबापर्यंत मदत पोहचवली आहे, आणखी २०० कुटुंबांपर्यंत मदत पोहचवणं बाकी आहे. मी नेहमी इतरांना थेट मदत करण्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे सकाळपासून अन्नधान्याची पाकीट बनवण्याकडे आमचा कल असतो”, नदीम टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीशी बोलत होता. यंदाच्या हंगामातील आयपीएल स्पर्धेबद्दल विचारलं असता नदीम म्हणाला, “सध्याच्या घडीला सर्वांच्या तब्येती चांगल्या राहणं हे महत्वाचं आहे. आज नाहीतर उद्या आयपीएल परत येणार आहे. मात्र माणसाचा जीव महत्वाचा आहे, मलाही घरी बसून काम करण्याव्यतिरीक्त कोणताही पर्याय नाहीये. कोणत्याही खेळाडूला सतत मैदानावर असणं आवडतं..पण सध्याच्या परिस्थितीत कोणताही पर्याय उपलब्ध नाही.”

अवश्य वाचा – लॉकडाऊनमध्ये कोणालाच आमची चिंता नाही ! दिव्यांग बॅडमिंटनपटू मानसी जोशीने व्यक्त केली खंत

२०१९ साली दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात अखेरच्या कसोटी सामन्यात नदीमला भारतीय संघात संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने बळी घेत स्वतःची निवड सार्थही ठरवली, मात्र यानंतर त्याला संघात स्थान मिळालं नाही. दरम्यान बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कार्यकाळात आयपीएल खेळवण्याचा विचार आहे. मात्र यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. देशातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 6:01 pm

Web Title: shahabaj nadeem helping 350 needy families to fight against corona virus threat psd 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोलकात्याचा महागडा खेळाडू पॅट कमिन्स म्हणतो, आयपीएल सुरु व्हावं ही प्रत्येकाची इच्छा !
2 लॉकडाऊनमध्ये कोणालाच आमची चिंता नाही ! दिव्यांग बॅडमिंटनपटू मानसी जोशीने व्यक्त केली खंत
3 स्मृती मंधानाच्या होणाऱ्या साथीदाराकडून आहेत फक्त दोन अपेक्षा, जाणून घ्या…
Just Now!
X