News Flash

काश्मीर वादाच्या प्रश्नावर आफ्रिदीचं उत्तर, म्हणाला…

काही दिवसांपूर्वी भारत, पंतप्रधान मोदींबाबत केली होती वादग्रस्त विधानं

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा कायम वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही महिन्यांत त्याने सातत्याने भारताबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तर त्याने पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अतिशय जहाल विचार मांडले होते. नुकतीच त्याने पाकिस्तान क्रिकेटला मुलाखत दिली. त्यात त्याने या संदर्भातील प्रश्नांची उत्तरं दिली.

आफ्रिदीची मुलाखत घेत असताना त्याला या वादग्रस्त विधानांबद्दल विचारण्यात आले. “भारताबद्दल किंवा काश्मीर प्रश्नावरून वादग्रस्त विधाने करताना कोणाच्या भावना दुखावल्या जातील किंवा तुझा सोशल मीडियावरील चाहतावर्ग (फॉलोअर्स) कमी होईल अशी तुला भीती वाटत नाही का?”, असा सवाल मुलाखतीदरम्यान आफ्रिदीला विचारण्यात आला. त्यावर आफ्रिदीने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं. “प्रत्येकाने नेहमी फक्त खरं बोलायला हवं. त्याचे परिणाम काय होतील याचा अजिबात विचार करू नये. माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं मी मानतो. म्हणूनच भारताबद्दल बोलायचं असेल तरीही मी माझी मतं मांडायला अजिबात घाबरत नाही”, असे आफ्रिदी म्हणाला.

“आफ्रिदी गेला खड्ड्यात… देशासाठी मी बंदूकही उचलेन”

जगभरात करोनाच्या तडाख्याने हाहा:कार माजला असताना पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी मात्र काश्मीर मुद्द्यावरून भारतीय व्यवस्था आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत होता. ‘काश्मीरी जनतेचा त्रास समजून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. काश्मीर वाचावायला हवे (#SaveKashmir)’, अशा आशयाचे ट्विट शाहिद आफ्रिदीने केले होते. तसेच, पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका ठिकाणी बोलताना आफ्रिदीने, “मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल मोदींना उत्तर द्यावंच लागेल”, अशी गरळ ओकली होती. यावरून क्रिकेटपटू हरभजन सिंग, युवराज सिंग आणि इतर आजी-माजी क्रिकेटपटूंनी आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:54 pm

Web Title: shahid afridi reaction on kashmir india pm modi criticism row says one should always speak the truth vjb 91
Next Stories
1 Video : घालीन लोटांगण… गोलंदाजाचा खतरनाक यॉर्कर अन् फलंदाज ‘क्लीन बोल्ड’
2 नरेंद्र मोदींचं वय ६९…तरीही देश चालवतायत, मग त्यांनी निवृत्त व्हायचं का??
3 भारतीय संघात माझं भविष्य काय हे धोनीमुळे मला समजलं – युवराज सिंह
Just Now!
X