News Flash

‘त्या’ कृत्याबद्दल माफी मागितल्यानंतरही शाकिब अल हसनवर कारवाई

बांगलादेशचा खेळाडू शाकिब अल हसनला मैदानात केलेलं कृत्य चांगलंच महाग पडलं आहे. लीगमधील चार सामने खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Shakib al Hasan misbehave
ढाका प्रीमिअर लीगमध्ये केलेल्या कृत्याबद्दल शाकिब अल हसनवर चार सामन्याची बंदी

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला मैदानात केलेलं कृत्य चांगलंच महाग पडलं आहे. ढाका प्रीमिअर लीगच्या एका सामन्यादरम्यान त्याने स्टम्पवर लाथ मारली होती. तसेच पंचावर धावून गेला होता. या कृत्यामुळे त्याच्यावर ढाका प्रीमिअर लीगमधील चार सामने खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ढाका मेट्रोपोलिस क्रिकेट समितीने ही कारवाई केली आहे. यापूर्वी शाकिबने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली होती.

बांग्लादेशात सुरु असलेल्या ढाका प्रिमियर लिग टी-२० स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला. मोहमद्दन स्पोर्टिंग क्लब आणि अबाहानी लिमिटेड या दोन संघादरम्यान सामना सुरु होता. मोहमद्दन स्पोर्टिंगचा खेळाडू शाकिब हसनने अबाहानी लिमिटेडच्या मुश्फिकुर रहीम याच्याविरोधात एलबीडब्लूचे अपील केलं. त्यावर अंपायरनी नॉट आऊटचा निर्णय घेतला. अंपायरच्या या निर्णयावर शाकिबने त्यांच्याशी वाद घातला आणि स्टंपवर लाथ मारली.

या सामन्याचा आणखी एका व्हिडीओमध्ये अंपायरने नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबला संताप अनावर झाल्याचे दिसत आहे. नॉट आऊटचा निर्णय दिल्यानंतर शाकिबने अंपायरशी वाद घातला. त्यानंतर रागाच्या भरात शाकिबने तिनही स्टंप्स काढून टाकल्या आणि त्या पीचवर फेकल्या. शाकिबच्या कृतीमुळे आता सोशल मीडियामध्ये त्यावर टीका केली जात आहे. कायमस्वरुपी बंदी आणावी अशी मागणीदेखील क्रिकेट चाहत्यांनी बांग्लादेश क्रिकेट बोर्डकडे आणि आयसीसीकडे केली आहे.

शाकिबची पत्नी उम्मी अहमद शिशिरने या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उम्मी अहमद शिशिरने फेसबुकवर एक पोस्ट टाकून पती शाकिबचा बचाव केला आहे. ”माझ्या नवऱ्याला असे कृत्य करण्यास भाग पाडले गेले आहे. शाकिबने मैदानावर जे काही केले, त्यामागे एखादे षडयंत्र रचले गेले असावे.”, अशी माहिती शाकिबच्या पत्नीने फेसबुकवर दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 7:08 pm

Web Title: shakib al hasan banned for four matches for bad behavior on the field rmt 84
Next Stories
1 क्रिकेटचा सराव करत असताना ऋतुराजने पाच वर्षात एक दिवसही सुट्टी घेतली नाही – प्रशिक्षक 
2 Euro Cup 2020 Live: स्वित्झर्लंड विरुद्ध वेल्स सामना बरोबरीत सुटला
3 करोनाग्रस्तांसाठी धावला युवराज सिंग..! ‘या’ राज्याला पुरवली वैद्यकीय सुविधा
Just Now!
X