श्रीलंका, बांगलादेश आणि भारत यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या निधास टी-२० मालिकेआधी, बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार शाकीब अल हसन बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तिरंगी मालिकेत खेळू शकणार नाहीये. शाकीबच्या अनुपस्थितीत आता मेहमद्दुला बांगलादेशचं नेतृत्वन करणार आहे.

शाकीब ऐवजी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दासला संघात स्थान दिलेलं आहे. बांगलादेशच्या स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर लिटन दासची संघात निवड करण्यात आल्याचं, क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे शाकीब अल हसन आपल्या बोटाला झालेल्या दुखापतीवर उपचार करुन घेण्यासाठी बँकॉक येथील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणार असल्याचं समजतंय.

६ मार्चपासून निधास चषकाच्या सामन्यांना सुरुवात होणार असून, हे सर्व सामने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडीयमवर खेळवण्यात येणार आहेत.

तिरंगी टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ पुढीलप्रमाणे –

मेहमदुला (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्य सरकार, इमरुल कायस, मुशफीकुर रहीम (यष्टीरक्षक), शब्बीर रेहमान, मुस्तफिजुर रेहमान, रुबेल हसन, तस्कीन अहमद, अबू हैदर, अबू जायेद, अरिफुल हक, नझमुल इस्लाम, नुरुल हसन, मेहंदी हसन, लिटन दास