भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताने 8 गडी राखून यजमान संघावर मात केली. सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी कराव्या लागणाऱ्या भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडला 157 धावांवर रोखलं. मोहम्मद शमीने किवींच्या सलामीवीरांना झटपट माघारी धाडत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं. यादरम्यान शमीने वन-डे क्रिकेटमध्ये 100 बळींचा टप्पा पूर्ण केला. सर्वात जलद 100 बळींचा टप्पा पूर्ण करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत शमीने इरफान पठाव व अन्य दिग्गजांना मागे टाकलं.

सामन्यात 3 बळी घेणाऱ्या शमीला सामनावीराचा किताब देण्यात आला. शमीने आपली ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या मुलीसाठी गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. शमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांचे आभार मानले आहेत.

5 सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतला दुसरा सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.