News Flash

टीम इंडियासाठी खूशखबर, मोहम्मद शमीची सरावाला सुरुवात

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शमी दुखापतग्रस्त झाला होता..

IND Vs ENG : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापतग्रस्त झालेला मोहम्मद शमीनं सरावाला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यामुळे शमी उर्वरीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आणि इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर होता.

मोहम्मद शमी तंदुरुस्त झाला असून सरावाला सुरुवात केली आहे. शमीनं गोलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार मोहम्मद शमी इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

पाहा व्हिडीओ –

मनगटाला दुखापतीतून सावरत शमीनं बंगळरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. १९ डिसेंबर रोजी अॅडिलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावांत फलंदाजी करताना शमीला दुखापत झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 1:28 pm

Web Title: shami resumes training may be available for 3rd test against england nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 IND vs ENG : भारताची खराब सुरुवात, रोहित-गिल तंबूत
2 ..हाच तो दिवस, कुंबळेने पाकच्या संपूर्ण संघाला केलं होतं गारद
3 जो रुटचा द्वशतकी दणका; इंग्लंडचा ५७८ धावांचा डोंगर
Just Now!
X