News Flash

भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत मोहम्मद शमी, पत्नीचा नवा आरोप

मी माझ्या पहिल्याच लग्नामुळे इतका अडचणीत आलोय, त्यामुळे दुसरं लग्न करायला मी काय तुम्हाला मुर्ख वाटतो का

भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करण्याच्या तयारीत मोहम्मद शमी, पत्नीचा नवा आरोप

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद अद्यापही सुरूच आहे. मोहम्मद शमी दुसऱ्या लग्नाची तयारी करत आहे असा नवा आरोप आता शमीच्या पत्नीकडून करण्यात आला आहे. शमी त्याच्या भावाच्या मेव्हणीसोबत दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे, असं हसीन जहांने म्हटलं आहे.

मोहम्मद शमीला त्याच्या भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करायचं आहे, ईदच्या पाच दिवसांनंतर भावाच्या मेव्हणीसोबत तो लग्न करणार आहे. त्यासाठीच त्याने पैशांचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला व तलाकचीही मागणी केली असा आरोप तिने केला आहे. पत्नीच्या आरोपांवर साधारणतः मौन धारण करणाऱ्या शमीने आता मात्र पत्नीच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. मी माझ्या पहिल्याच लग्नामुळे इतका अडचणीत आलोय, त्यामुळे दुसरं लग्न करायला मी काय तुम्हाला मुर्ख वाटतो का असं शमी म्हणाला. पत्नीने गेल्या काही महिन्यांमध्ये माझ्यावर बरेच आऱोप केले , त्यामध्ये आणखी एका आरोपाची भर पडली आहे. जर असं असेल तर ठीक आहे मी दुसऱ्या लग्नाचं निमंत्रण तिला पाठवेल अशी उपहासात्मक प्रतिक्रिया शमीने दिली.

शमी आयपीएल-२०१८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता , मात्र पत्नीने केलेल्या आरोपांमुळे तो अधिकांश सामन्यांना त्याला मुकायला लागलं, त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये आपली छाप सोडण्यासही तो अपयशी ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 9:12 am

Web Title: shami wants to marry the sister in law new allegation from wife
Next Stories
1 खेळाचा दर्जा उंचावण्यासाठी दर्जेदार प्रशिक्षकाची गरज!
2 हिरो काँटिनेंटल फुटबॉल कप: केनियाचा धुव्वा उडवत भारताचे जेतेपद, छेत्रीचे २ गोल
3 नदालचे विक्रमी यश, अकराव्यांदा जिंकले फ्रेंच ओपन
Just Now!
X