News Flash

हसीन जहाँ भेटायला गेली पण शमीची आई बनली ‘बॉडीगार्ड’

शमीच्या गाडीला ट्रकने धडक दिली.

क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या अपघाताची माहिती समजल्यानंतर चिंता व्यक्त करणारी त्याची पत्नी हसीन जहाँ शमीला भेटण्यासाठी दिल्लीला गेली होती. पण त्यावेळी शमीची आई बॉडीगार्ड बनून समोर उभी राहिल्याने ही भेट फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. शमी अपघातात जखमी झाल्याने त्याला भेटण्यासाठी म्हणून मी दिल्लीला आली होती. पण त्याने मला उलटे धमकावले व कोर्टात बघून घेईन असे सांगितले. यावेळी शमीची आई बॉडीगार्ड सारखी वागत होती असा आरोप हसीन जहाँने केला आहे.

शमी आम्हाला भेटला आणि मुलीबरोबरही खेळला. पण त्याने मला ओळखही दाखवला नाही. त्याची आई बॉडीगार्ड असल्यासारखी वागत होती असे हसनीने म्हटले आहे. शमी रविवारी डेहराडूनहून दिल्लीला येत असताना त्याच्या गाडीला ट्रकने धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या शमीवर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

माझ्या मुलीने शमीचा फोटो बिघतल्यानंतर तिला वडिलांना भेटायचे होते. त्यासाठी मी इथे आले होते. आमच्यात कुठलाही समेट होण्याचा प्रश्नच नाही असे हसीन जहाँने म्हटले आहे. , हसीन जहाँला जेव्हा रविवारी मोहम्मद शमीच्या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘आपल्याला बातमी ऐकून धक्का बसला आहे. शमी सुखरुप रहावा यासाठी देवाकडे प्रार्थना करेन’. हसीन जहाँने आपल्याला शमीचं वाईट व्हावं असं अजिबात वाटत नसल्याचंही म्हटलं आहे. आपण शमीचे कट्टर शत्रू नाही आहोत. शमी लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करेन असं तिने म्हटलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 3:23 pm

Web Title: shamis wife mother bodyguard
टॅग : Mohammed Shami
Next Stories
1 शिखर धवनमधला ‘बापमाणूस’ पाहिलात का?
2 Ball Tampering : स्टीव्ह स्मिथ व वॉर्नरवर एक वर्षाची बंदी, IPL मधूनही गच्छन्ती
3 Ball Tampering : आणखी एक विकेट, डेव्हिड वॉर्नरचा सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाचा राजीनामा
Just Now!
X