आयपीएलमधील पहिल्या अल्पकालीन कोविड-19चा पर्यायी खेळाडू म्हणून मुंबईचा डावखुरा युवा फिरकीपटू शम्स मुलानीचा दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल अद्याप करोनातून सावरला नाही. अजूनही तो वैद्यकीय सुविधेत आहे. दुखापतग्रस्त कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी दिल्लीने कर्नाटकचा फलंदाज आणि ऑफस्पिनर अनिरुद्ध जोशीचा संघात समावेश केला आहे.

 

3 एप्रिलला अक्षर आढळला करोना पॉझिटिव्ह

अक्षर पटेल 3 एप्रिलला करोना पॉझिटिव्ह आढळला. हळूहळू लक्षणे दिसू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षरला आता चाचणी होऊन 12 दिवस झाले आहेत. तो आयपीएलसाठी लवकर उपलब्ध होणार नाही, अशी चर्चा आहे.

शम्स मुलाणी हा डावखुरा फिरकीपटू आणि मधल्या फळीतील फलंदाज आहे. 24 वर्षीय मुलाणीने 25 टी-20 सामन्यांत 6.92 च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. तर,फलंदाजीच त्याची सर्वोत्तम खेळी 73 धावांची आहे. दिल्ली कॅपिटल संघापासून विभक्त झाल्यानंतर मुलाणीला सध्याच्या मोसमात आयपीएलच्या इतर कोणत्याही फ्रेंचायझीकडून खेळण्याची संधी मिळणार नाही.

अय्यरच्या बदली अनिरुद्ध जोशी

दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या बदली दिल्लीने अनिरुद्ध जोशीला संघात स्थान दिले आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. मधल्या फळीतील फलंदाज आणि ऑफस्पिनर अशी ओळख असेलल्या जोशीचा हा आयपीएलमधी तिसरा संघ असेल. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सच्या संघात सहभागी झाला आहे. तो घरगुती क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व करतो आणि आतापर्यंत 17 लिस्ट ए आणि 22 टी-20 सामने खेळला आहे.