24 April 2019

News Flash

शेन वॉर्न म्हणतो ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचा ठेचला अहंकार

शेन वॉर्न हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता.

जगप्रसिद्ध फिरकीपटू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्न याचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. या आत्मचरित्रात शेन वॉर्नने त्याच्या जीवनातील विविध घटनांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्याने IPL दरम्यान भारतात जो काही काळ घालवला, त्याचेही उल्लेख केला आहे. याबद्दलचा एक अनुभव सांगताना त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याला गर्विष्ठ म्हटले आहे.

शेन वॉर्न हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. त्याचा या संघातील खेळाडू आणि इतर सदस्यांशी आलेला संबंध याबाबत त्याने मोकळेपणाने मत मांडले आहे. IPLमुळे शेन वॉर्न बराच काळ भारतात वास्तव्यास होता. वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने आयपीएलच्या पहिल्या आयपीएलचे विजेतेपद पटकावले. वॉर्नने त्याच्या ‘नो स्पिन’ या आत्मचरित्रात याचे काही किस्से लिहिले आहेत.

कैफबाबत बोलताना तो म्हणाला की मी राजस्थान रॉयल्सच्या संघासोबत पहिल्यांदा एका हॉटेलात वास्तव्यासाठी उतरलो, तेव्हा सर्वजण आपापल्या खोल्यांकडे गेले. मी खोलीमध्ये गेलो नव्हतो. मी संघमालकांशी बोलत होतो. तेव्हा कैफ हॉटेलमधील कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत बोलत होता. तो कर्मचाऱ्यांना ‘मी कैफ आहे’, असे वारंवार सांगत होता. जेव्हा वॉर्नने त्याला याबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला कि त्याला इतर खेळाडूंप्रमाणे लहान खोली मिळाली आहे.

यावर वॉर्नने त्याला विचारले की तुला मोठी खोली हवी आहे का? त्यावर तो म्हणाला हो, ‘मी कैफ आहे’. वॉर्नच्या लक्षात आले की, कैफ हा वरिष्ठ खेळाडू असल्याने तो मोठ्या खोलीची अपेक्षा करत आहे. त्यावर वॉर्नने त्याला सांगितले की, ‘इथल्या सर्वच खेळाडुंना समान आकाराच्या खोल्या दिल्या आहेत केवळ मला मोठी खोली देण्यात आली आहे’. संघमालक, प्रशिक्षक आणि इतरांशी भेटीगाठी करण्यासाठी मला मोठी खोली देण्यात आली आहे. हे ऐकल्यावर तो काहीही बोलला नाही.

First Published on November 7, 2018 2:47 pm

Web Title: shane warne says i bursted kaifs ego
टॅग Shane Warne