26 September 2020

News Flash

शेन वॉटसनची निवृत्तीची घोषणा

परिवाराला वेळ देता यावा म्हणून घेतला निर्णय

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने, स्थानिक बिग बॅश लीग स्पर्धेमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटसन बिग बॅश लिगमध्ये सिडनी थंडर संघाचा कर्णधार होता. मात्र आपल्या परिवारासोबत वेळ घालवता यावा यासाठी आपण निवृत्ती घेत असल्याचं वॉटसनने जाहीर केलं.

३७ वर्षीय वॉटसनने सलग ४ वर्ष सिडनी थंडर संघांचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यावेळी वॉटसनने सिडनी थंडरच्या संघ प्रशासनाचे आभार मानले. सिडनी थंडरकडून शेन वॉटसनने सर्वाधिक १ हजार १४ धावा करण्याचा बहुमान मिळवला आहे. याव्यतिरीक्त वॉटसनच्या नावावर १९ बळीही जमा आहेत. सध्या वॉटसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 3:22 pm

Web Title: shane watson bids adieu to big bash league
Next Stories
1 ISSF World Cup : १६ वर्षीय दिव्यांशने कमावला ऑलिम्पिक कोटा, रौप्यपदकाची कमाई
2 Women’s IPL : मराठमोळ्या स्मृतीकडे महिला IPL संघाचे नेतृत्व
3 IPL 2019 : गड आला, पण सिंह विक्रमाला मुकला!
Just Now!
X