* सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेस्टइंडीजवर चार विकेट्सने विजय
आयपीएलमधली उत्तम फलंदाजीची कामगिरी कायम राखत आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक सामन्यांसाठीच्या सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाज शेन वॉटसनच्या  धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडीज संघावर विजय प्राप्त केला. वेस्टइंडीज संघाचे २५६ धावांचे लक्ष्य कांगारु संघाने अवघ्या ३९ व्या षटकात गाठले, तरी ऑस्ट्रेलियाची सुरूवात कमकुवत झाली होती. दुसऱ्या षटकात डेव्हीड वॉरनर आणि फिलिप ह्युजेस शुन्यावर बाद झाले. त्यानंतर शेन वॉटसनने ९८ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३५ धावांची खेळी साकारली. वॉटसनला साथ देत अॅडम वोजेसने सामन्यात ४३ धावा ठोकल्या आणि सरतेशेवटी ऑस्ट्रेलियाने विजय प्राप्त केला.

सामन्याच्या सुरूवातीला वेस्टइंडीज संघाकडून ड्वेन ब्रावोने ८६ व संघाचा सलामीचा फलंदाज जॉन्सन चार्ल्सने ५५ धावा केल्या. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेट्ससाठी ६५ धावांची भागिदारी झाली, तरी वेस्टइंडीज संघ ५० षटकांच्या सरतेशेवटी २५६ धावा करू शकला. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने वॉटसन नावाच्या वादळी फलंदाजाच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर सहजरित्या गाठले.