03 August 2020

News Flash

प्रणव धनावडेला एमसीएकडून दहा हजारांची मासिक शिष्यवृत्ती; शरद पवारांची घोषणा

प्रणवने नाबाद १००९ धावांची खेळी साकारली होती

एकाच डावात हजार धावांची कल्पनातीत खेळी साकारणाऱ्या प्रणव धनावडेला मुंबई क्रिकेट संघटनेकडून (एमसीए) १० हजारांची मासिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. एमसीएचे संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी ही घोषणा केली. प्रणवने मंगळवारी भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत (१६ वर्षांखालील) के. सी. गांधी संघाकडून खेळताना नाबाद १००९ धावांची खेळी साकारली होती. या खेळीत १२९ चौकार आणि ५९ षटकारांचा समावेश होता. प्रणवच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी यांनी प्रणवच्या कामगिरीचे कौतूक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय, प्रणवच्या या कामगिराचा राज्य सरकारच्या वतीने सन्मान करण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने प्रणवच्या क्रिकेट प्रशिक्षणाकरिता त्याला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी दिले होते.

विक्रमादित्य प्रणव!
दोन पिढय़ांचे स्वप्न प्रणवकडून साकार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 3:08 pm

Web Title: sharad pawar on behalf of mca announced a scholarship of 10k per month to pranav dhanawade for scoring world record
टॅग Mca,Sharad Pawar
Next Stories
1 ख्रिस गेलचे ड्रेसिंग रुममध्ये महिलेशी असभ्य वर्तन
2 खेळताना कायम तिरंगा फडकवण्याचाच विचार !
3 ऑस्ट्रेलिया दौरा युवा खेळाडूंसाठी फायद्याचा – महेंद्रसिंग धोनी
Just Now!
X