News Flash

मारिया शारापोवाने राफेल नदालचा केला ‘बकरा’

नेटकऱ्यांनी मारियाला ट्विटरवर केले ट्रोल

स्विस ब्युटी मारिया शारापोवाने राफेल नदालला बकरा असे म्हणत त्याच्यासोबत टेनिस प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. दोन मिनिटे बकऱ्यासोबत टेनिस खेळून मी माझी बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण केली असे म्हणत मारिया शारापोवाने हा व्हिडिओ ट्विट केला. त्यात तिने राफेल नदाललाही टॅग केले आहे. मात्र नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मारियाला ट्रोल केले आहे.

मारिया शारापोवाच्या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. राफेल नदाल हा टेनिसचा किंग आहे त्याच्याबद्दल असे बोलणे तुला शोभत नाही असे म्हणत नेटकऱ्यांनी मारियाला माफी मागण्याचाही सल्ला दिला आहे. मात्र अनेकांना हे ठाऊक नसेल की राफेल नदालला GOAT या टोपण नावानेही संबोधले जाते. मारिया शारापोवाने आपल्या ट्विटमध्ये बकऱ्याचा फोटो टाकून त्यापुढे ही चार अक्षरे लिहिल्याने अनेकांचा गैरसमज झालेला दिसतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 5:57 pm

Web Title: sharapova asks nadal to practise with her calls him goat
Next Stories
1 टीम इंडिया ‘Selfish’, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्क वॉची भारतीय संघावर टीका
2 Video: धोनीच्या झिवाचा ब्राव्होसोबत चॅम्पियन डान्स
3 दुबईतील आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन्स ट्रॉफीवर ठाणेकरांचा झेंडा
Just Now!
X