News Flash

शारापोव्हाला दमदार पुनरागमनाचा विश्वास

माजी अव्वल मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाला दमदार पुनरागमन करण्याचा विश्वास आहे

माजी अव्वल मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हाला दमदार पुनरागमन करण्याचा विश्वास आहे. मावळत्या २०१९ या वर्षांत शारापोव्हाला खांद्याच्या दुखापतीने त्रस्त केले होते. मात्र तरीदेखील पाच ग्रॅँडस्लॅम विजेत्या शारापोव्हाला ब्रिस्बेनमधील टेनिस स्पर्धेसाठी आयोजकांनी थेट प्रवेशिका दिली आहे.

थेट प्रवेशिका मिळाल्यामुळे शारापोव्हाला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची तयारी करण्याची संधी मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत शारापोव्हाला अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सकडून पराभवाचा धक्का बसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:07 am

Web Title: sharapova confident return to power akp 94
Next Stories
1 २०१९ हे वर्ष यशाचे आणि शिकण्याचे -बुमरा
2 धोनीचं क्रिकेटपटू म्हणून भविष्य काय? कुंबळे म्हणतो…
3 यशस्वी भव! 2020 मध्ये असा असेल ‘विराटसेने’चा कार्यक्रम
Just Now!
X