पालघर : दुखापतीतून सावरल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण करत ब्रिस्बेन येथे चांगला खेळ करून भारताला विजयाच्या वाटेवर नेणाऱ्या शार्दूलचा व भारतीय संघाचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया शार्दूलचे वडील नरेंद्र व आई हंसा ठाकूर यांनी व्यक्त के ली.
‘‘ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात नमवणे सोपे नाही. मात्र शार्दूल व भारतीय खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे अखेर भारताने विजयश्री खेचून आणली. संयमी शार्दूलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधीचे सोने करणारी खेळी साकारली,’’ असे नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले.
‘‘सुरुवातीला माहीम गावातील खेळपट्टय़ांवर त्याने आपली चमक दाखवायला सुरुवात केली व पुढे बोईसर येथील मोठय़ा खेळाच्या मैदानामध्ये तो खऱ्या अर्थाने आपला खेळ दाखवू लागला. मनात असलेली जिद्द त्याने सार्थकी लावली,’’ असे हंसा ठाकूर यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 3:23 am