04 March 2021

News Flash

Video : जेव्हा ठाकूर साहेब भडकतात ! मॅक्सवेलचा कॅच सोडणाऱ्या चहरला दिल्ली खुन्नस

जीवदानाचा फायदा घेत मॅक्सवेलची ५४ धावांची खेळी

व्हाईटवॉशच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. १२ धावांनी बाजी मारत ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेचा शेवट गोड केला. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी गलथान खेळी केली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे अनेक सोपे झेल खेळाडूंनी सोडले.

१७ व्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असताना मॅक्सवेलने मारलेला उंच फटका दीपक चहरच्या दिशेने गेला. परंतू दीपकने अत्यंत सोपा झेल सोडत मॅक्सवेलला जीवदान दिलं. हातात आलेली विकेट सोडल्यानंतर निराश झालेल्या शार्दुलच्या चेहऱ्यावरचे भाव यावेळी पाहण्यासारखे होते.

ग्लेन मॅक्सवेलनेही आपल्याला मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ३६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह मॅक्सवेलने ५४ धावा केल्या. अखेरच्या षटकात टी. नटराजनने त्याला माघारी धाडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 8:32 pm

Web Title: shardul thakur gives deepak chahar a death stare for dropping glenn maxwell in 3rd t20i psd 91
Next Stories
1 माझ्यासाठी तूच खरा मालिकावीर ! हार्दिक पांड्याने केलं नटराजनचं कौतुक
2 विराट कोहलीने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण, म्हणाला…
3 ऑस्ट्रेलियाने रोखला भारताचा विजयरथ
Just Now!
X