News Flash

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाचव्या स्थानासाठी शार्दुल ठाकूर-मोहम्मद सिराजमध्ये शर्यत

इशांत-भुवनेश्वरची दुखापतीमुळे माघार

आयपीएलचा तेरावा हंगाम आटोपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय या दौऱ्यासाठी २५ ते ३० खेळाडूंचा भारतीय संघ पाठवणार आहे. या दौऱ्यात कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या गोलंदाजाच्या स्थानासाठी मुंबईचा शार्दुल ठाकूर आणि हैदराबादचा मोहम्मद सिराज यांच्यात शर्यत असल्याचं समजतंय. सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची निवड समिती आठवड्याच्या अखेरीस भारतीय संघाची निवड करणार आहे.

भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा हे दोन गोलंदाज सध्या दुखापतीमुळे आयपीएल खेळत नाहीयेत, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही हे खेळाडू खेळणार नाहीयेत. त्यामुळे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या गोलंदाजांच्या मदतीला नवदीप सैनी याचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पाचव्या क्रमांकाच्या जागेसाठी शार्दुल आणि सिराज यांच्यापैकी कोणाला स्थान मिळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. शार्दुल ठाकूरने याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं, परंतू गोलंदाजी करताना झालेल्या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करु शकला नव्हता. भारत अ संघाकडून खेळताना मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी केली होती, त्यातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोहम्मद सिराजची गती भारतीय संघासाठी फायदेशीर ठरु शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 4:52 pm

Web Title: shardul thakur mohammed siraj to fight for fifth pacers slot for australia tests psd 91
Next Stories
1 धोनीच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला माजी कर्णधार
2 HBD Veeru: साऱ्यांना हटके विश करणाऱ्या विरूला क्रिकेटपटूंनी ‘अशा’ दिल्या सदिच्छा
3 कौटुंबिक वादामुळे पी.व्ही. सिंधू लंडनला निघून गेली ?
Just Now!
X