News Flash

मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला चौथ्या कसोटीत संधी मिळण्याचे संकेत

रविंद्र जाडेजा कसोटी मालिकेतून बाहेर

सिडनी येथे झालेल्या रोमांचक कसोटी सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करत असताना झालेल्या दुखापतीमुळे रविंद्र जाडेडाला भारतीय संघातून आपलं स्थान गमवावं लागलं आहे. आपेक्षाप्रमाणं बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्राकाद्वारे रविंद्र जाडेजा चौथ्या कसोटी मालिकेला मुकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजाच्या जागी कोणाला संधी मिळणार? याकडे सर्व क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

आणखी वाचा- सिडनीत जिगरबाज खेळी करणारा फलंदाज संघाबाहेर

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्याचा विचार करत आहे. १५ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा- भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

शार्दुलने याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात कसोटी पदार्पण केलं होतं. मात्र याच सामन्यात त्याला दुखापतीमुळे गोलंदाजी करता आली नाही. त्याच्या दृष्टीकोनातून तो प्रसंग थोडा दुर्दैवी होता. त्यामुळे त्याला जाडेजाऐवजी संघात जागा मिळू शकते. कारण शार्दुल वेळप्रसंगी फलंदाजीही करु शकतो. त्यामुळेच त्याचं पारडं जड मानलं जात आहे. मात्र, संघ व्यवस्थापन ब्रिस्बेन येथे दोन फिरकी गोलंदाजानिशी मैदानात उतरणार असल्याच कुलदीप यादवला संधी मिळू शकते. याबाबतचा अंतिम निर्णय प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि कर्णधार अजिंक्य रहाणे घेणार असल्याचं कळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 9:06 am

Web Title: shardul thakur to replace injured jadeja nck 90
Next Stories
1 सिडनीत जिगरबाज खेळी करणारा फलंदाज संघाबाहेर
2 ‘आयपीएल’च्या १४व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव ११ फेब्रुवारीला?
3 सायना, सिंधूचे चांगल्या कामगिरीचे लक्ष्य
Just Now!
X